दिवा – ठाणे महानगर पालिकेच्या दिवा प्रभाग समिती हद्दीतील “भारतीय जनता पार्टी” च्या दिवा-शीळ मंडळा तर्फे भारतरत्न स्व.अटल बिहारीं वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भव्य रैली चे आयोजन करण्यात आले, याचेच अवचित्य साधून भाजपा दिवा-शीळ मंडळाच्या वतीने कल्याण ग्रामीण चे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या शुभ हस्ते प्रचाराचा नारळ फोडत जोरदार शक्ती प्रदर्शन करत भव्य अशी रैली काढण्यात आली ज्यामध्ये शेकडो कारकर्ते व पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग पाहायला मिळाला.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री स्वामी समर्थ माठातून करण्यात आली, यावेळी नुकतेच भाजपा पक्षात प्रवेश केलेले कल्याण ग्रामीण चे माजी आमदार सुभाष भोईर, दिवा-शीळ मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य नरेश पवार, अशोक पाटील, विजय भोईर, विनोद भगत, गणेश भगत, सतीश केळशीकर, रोशन भगत, अभिषेक ठाकूर तसेच महिला मोर्चा अध्यक्षा सौ.सपना भगत, सीमा भगत, रेश्मा पवार यांसह असंख्य पदाधिकारी व शेकडोनी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.






