Written by
Bureau Report
मुंबई | पार्कसाइट परिसरात आज सकाळी बुर्का घालून फिरत असलेल्या एका व्यक्तीला बालचोर समजून जमावाने मारहाण केल्याची घटना घडली. अफवेच्या आधारावर नागरिकांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस चौकशीत त्याची ओळख तौसीफ मोहम्मद शेख (वय 33), रिक्षाचालक व स्थानिक रहिवासी अशी झाली. भाड्याच्या वादात पैसे न देणाऱ्या प्रवाशांना शोधण्यासाठी ओळख लपवण्यासाठी त्याने बुर्का घातल्याचे उघड झाले. पोलिसांनी ‘बालचोरी’ची अफवा निराधार असल्याचे स्पष्ट करत नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.







