
दिवा- ‘करूया संकल्प नवा, नव्या विचारांनी बदलू दिवा’ असा नारा देत वंचित बहुजन आघाडीचे नेते विकास इंगळे यांनी दिवा शहरातील राजकीय परिवर्तनाची गरज अधोरेखित केली आहे. जोपर्यंत दिवा शहरात राजकीय परिवर्तन होत नाही, तोपर्यंत दिवा शहरातील वंचित बहुजन समाजाला न्याय मिळणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या या घोषणेनुसार, “दिवा शहरातील सामान्य माणसाच्या हक्कासाठी” हा लढा उभारण्यात येत आहे. विकास इंगळे यांनी स्पष्ट केले की, प्रस्थापित राजकीय व्यवस्थेत बदल झाल्याशिवाय सामान्य माणसाच्या आणि विशेषतः वंचित बहुजन समाजाच्या हक्कांची पूर्तता होणार नाही.
‘नव्या विचारांनी बदलू दिवा’ या संकल्पाद्वारे, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर टीका करत शहराच्या विकासासाठी आणि वंचितांच्या न्यायासाठी नव्या नेतृत्वाची आणि नव्या विचारांची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. दिवा प्रभाग समितीत शत प्रतिशत उमेदवार देऊन अधिकाधिक उमेदवार निवडून आणणार असून वंचित बहुजन आघाडीच राजकीय परिवर्तन आणेल असा विश्वास इंगळे यांनी व्यक्त केला.
शहरातील सामान्य माणसाला न्याय मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






