संभाव्य दुबार मतदारांची छाननी पूर्ण, 67 हजाराहून अधिक मतदारांच्या नावासमोरील स्टार चिन्ह हटविणार

Author Image
Written by
Bureau Report

ठाणे (28) : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीची पडताळणी करुन संभाव्य दुबार मतदारांची सखोल छाननी पूर्ण करण्यात आली आहे. या प्रक्रियेत एकूण 83,645 संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करण्यात आली. मतदार यादी पडताळणीत 67071 मतदारांची नावे व फोटो एकमेकांशी जुळत नाहीत. अर्थात सदर मतदार ‘दुबार मतदार’ नाहीत. त्यामुळे या मतदारांच्या नावासमोरील स्टार (**) चिन्ह हटविण्यात येणार आहे. यामुळे या मतदारांना कोणत्याही अडथळ्याविना मतदानाचा हक्क बजावता येणार असल्याची माहिती उपायुक्त (निवडणूक) उमेश बिरारी यांनी दिली. 

      दरम्यान मतदार यादीत नाव व फोटो पूर्णतः समान असलेले 16,574 मतदार प्रत्यक्ष दुबार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा मतदारांच्या नावासमोर स्टार (**) चिन्ह कायम ठेवण्यात येणार असून, सदर मतदारांच्या नावापुढे ‘दुबार मतदार’ असा शिक्का मतदार यादीत असणार आहे. अशा मतदारांना मतदान केंद्रावर विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून देऊन मतदान करता येईल. दुबार मतदान टाळण्यासाठी त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवले जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. संबंधित मतदाराने आपण एकाच ठिकाणी आणि एकदाच मतदान करीत असल्याचे लेखी हमीपत्र दिल्यानंतर मतदानाची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त उमेश ‍बिरारी यांनी दिली. 

       निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे, दुबार व बनावट मतदानास आळा घालणे तसेच पात्र मतदाराचा हक्क सुरक्षित ठेवणे, या उद्देशाने ही छाननी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मतदार यादी अचूक व दोषमुक्त असणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याने, प्रशासनाकडून ही कार्यवाही काटेकोरपणे करण्यात येत आहे. या सुधारणांमुळे ठाणे महानगरपालिका निवडणूक अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला:
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला:

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया :
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया :

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

महाशिवरात्रि: ईशा फाउंडेशन में आयोजित हुआ विशेष समारोह, केंद्रीय मंत्री अमित शाह भी हुए शामिल, देखें VIDEO
आज फोकस में

महाशिवरात्रि: ईशा फाउंडेशन में आयोजित हुआ विशेष समारोह, केंद्रीय मंत्री अमित शाह भी हुए शामिल, देखें VIDEO

पीएम नरेंद्र मोदी की डिग्री अदालत को दिखा सकते हैं, लेकिन अजनबियों को नहीं: दिल्ली विश्वविद्यालय
आज फोकस में

पीएम नरेंद्र मोदी की डिग्री अदालत को दिखा सकते हैं, लेकिन अजनबियों को नहीं: दिल्ली विश्वविद्यालय

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल