
Written by
Amol Jadhav

ठाणे दिवा शहरातील हरहुन्नरी,उत्कृष्ट, मेहनती, प्रामाणिक, आणि हाडाचा कलाकार अभिनेता अमोल अविनाश पवार. यांच्या विनोदी नाटकाचा शुभारंभाचा पहिला प्रयोग आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण या ठिकाणी खूप जोशात पार पडला. विशेष म्हणजे आपल्या दिव्यातील अभिनेता अमोल पवार यांनी साकारलेलं पात्र शेवटपर्यंत रसिक प्रेक्षकांना मनमुराद हसवत राहील. नाटकाचा पहिला प्रयोग आहे हे कुठेही जाणवू दिल नाही. प्रेक्षकांनी आपलं मत व्यक्त करताना सांगितलं कि हा शंभरावा प्रयोग आहे असं सादरीकरण झालं. या सर्वाचे श्रेय दिग्दर्शक आनंद दीपनाईक आणि सर्व कलाकार यांना जात. या नाटकाला दिग्दर्शक लेखक अमोल जाधव यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. आणि नाटकाच्या आणि अमोल पवार याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






