
दिव्यात ९ ऑगस्ट रोजी कलगी-तुऱ्याचा महासंग्राम; नामवंत शाहिरांमध्ये रंगणार शब्दांची जुगलबंदी
दिवा | प्रतिनिधी
नवतरुण मित्र मंडळ, दिवा यांच्या वतीने रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता जिव्हाळा हॉल, दिवा-शीळ रोड येथे भव्य कलगी-तुऱ्याचा महासंग्राम आयोजित करण्यात आला आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्रातील दोन नामवंत शाहिरांमध्ये शब्दांची रोमहर्षक जुगलबंदी रंगणार असून रसिकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षण ठरणार आहे.
या महासंग्रामात कोकणरत्न पुरस्कार प्राप्त कलगीवाले शाहीर संदीप वा. मोरे (खेड, ब्रह्मनिष्ठ सदगुरू सदालाल घराणे, शाखा – दिवाडकर नृत्य कला पथक, रोहिणीगाव, म्हसळा, रायगड) तसेच तुरेवाले शाहीर सचिन धुमक (ढाकमोळी, ता. चिपळूण, बाबू रंगेले घराणे, श्री नटेश्वर नृत्यकला संच, मुंबई) यांच्यात दमदार सामना रंगणार आहे.
“शब्दा-शब्दांची जुगलबंदी, शब्दा-शब्दांची हाणामारी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात दोन्ही शाहीर आपल्या काव्यप्रतिभा, विनोदबुद्धी आणि हजरजबाबीपणाची अनोखी मेजवानी रसिकांना देणार आहेत.
यावेळी उपस्थित प्रेक्षकांमधून १० भाग्यवान विजेत्यांना आकर्षक टी-शर्ट भेट देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. कार्यक्रमासाठी मर्यादित तिकिटे शिल्लक असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपले आसन आरक्षित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क :
लक्ष्मण जाधव – 9833013192
अक्षय कदम – 8369867699
सिद्धेश उतेकर – 7498007801
कमलाकर पानवलकर – 8928325072
दिगंबर शितप – 8928576405
गणेश एकावडे – 9702223013
सुदर्शन जाधव – 9167821276
प्रीतम शिंदे – 7208948025
विकास इंगळे








