[gtranslate]

दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईची मागणी

Author Image
Written by
Divya Chavan

दिवा:- आज डोंबिवली येथे आयोजित जनता दरबारामध्ये दिवा-शीळ नागरी हक्क समितीच्या वतीने कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना दिवा परिसरातील सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांबाबत निवेदन देण्यात आले.

या निवेदनाची दखल घेत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना पत्र देऊन सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश देत संबंधित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

यावेळी निवेदन देताना माजी नगरसेवक हिरा पाटील, ॲड. रोहिदास मुंडे व इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

दिवा परिसरात होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर ठाणे महानगरपालिकेने तातडीने ठोस व कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिवा-शीळ नागरी हक्क समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल