ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान

Author Image
Written by
Vikas Ingle

ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान⭕

विकास इंगळे – प्रतिनिधी

ठाणे (04) : ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समितींच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक आज महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी महापालिका सचिव मनीष जोशी उपस्थित होते. या निवडणुकीत 8 जणांची बिनविरोध निवड झाली असून मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत दिपाली भगत विजयी झाल्या. यावेळी महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रविंद्र फाटक, आमदार राजेश मोरे, पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व नवनिर्वाचित प्रभाग समिती अध्यक्षांचे अभिनंदन व पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी मिनल मुकुंद संख्ये, वर्तकनगर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी जयश्री जेरी डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी सिद्धार्थ दिलीप ओवळेकर, उथळसर प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी नारायण शंकर पवार, कळवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी विजया मनोज लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक नामदेव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी मात्र चुरशीची लढत झाली. ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे अन्सारी नफीस अहमद मोहम्मद अनीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या दिपाली मोतीराम भगत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या दोन्ही उमेदवारांमध्ये झालेल्या मतदानात अन्सारी यांना 4 मते, तर दिपाली भगत यांना 10 मते मिळाली. त्यामुळे पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिपाली भगत यांना विजयी घोषित केले.

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश
आज फोकस में

कल्याण-डोंबिवलीतील विद्यार्थ्यांचा सम्यक विद्यार्थी आंदोलनात जाहीर प्रवेश

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले
आज फोकस में

सासणे नगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; संतप्त नागरिकांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला
आज फोकस में

सुजात आंबेडकर यांचा मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!
आज फोकस में

वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोणावळा येथे वंचित बहुजन आघाडी नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारणीची बैठक संपन्न…!

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही
आज फोकस में

परंड्यात हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल; घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप नाही

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च
आज फोकस में

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च

अंतरराष्ट्रीय मुद्रा कोष ने अपने राहत कार्यक्रम की अगली किस्त जारी करने के लिए पाकिस्तान पर 11 नई शर्तें लगाई हैं। वैश्विक मंच पर क्या यह भारत की बड़ी जीत है?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल