⭕दिव्यात घरफोडीतील ८ लाख ८४ हजारांच्या दागिन्यासह आरोपी अटकेत.

Author Image
Written by
Divya Chavan

⭕दिव्यात घरफोडीतील ८ लाख ८४ हजारांच्या दागिन्यासह आरोपी अटकेत.

 

ठाणे ता १४ ऑगस्ट : मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा पोलीस चौकीच्या हद्दीत घरफोडी करून ८ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरी करणारा आरोपी हा फिर्यादी राहत असलेल्या त्याच बिल्डिंगमधील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले आहे. गाळा खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असल्याने आरोपीने चोरीचे दागिने भांडूप येथील फायनान्स कंपनीत गहाण ठेवल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. दिवा पूर्व येथील गणेश नगर, गणेश पाडा परिसरातील गोविंदधाम अपार्टमेंट, सी विंग येथील रहिवासी सौ. रोहिणी संदीप मेते (वय ३०, व्यवसाय-गृहिणी) यांच्या राहत्या घरात ३ ऑगस्ट २०२६ रोजी घरफोडी झाली होती. या घटनेत त्यांच्या घरातील एकूण ८ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. तक्रारीवरून मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. १३३३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, फिर्यादी राहत असलेल्या त्याच बिल्डिंगमधील संशयित आरोपी विनेश वसंत गोरीवले (वय ३७ वर्षे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याला ४ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

आरोपीला गाळा खरेदी करण्यासाठी पैशांची गरज असल्याने त्याने चोरीचे दागिने स्वतःचे व पत्नीचे असल्याचे खोटे सांगून फायनान्स कंपनीत गहाण ठेवल्याचे तपासात समोर आले. भांडूप येथील साई धरम फायनान्स येथून नीलम उत्तेकर यांनी संबंधित दागिने पोलिसांकडे आणून जमा केले. त्यानंतर दोन पंचांच्या उपस्थितीत पंचनामा करून हा मुद्देमाल पुढील तपासासाठी जप्त करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. सदरची कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस सहआयुक्त पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग अशोक दुथे, पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ बाळासाहेब पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग स्वप्निल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल