[gtranslate]

व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्च

Author Image
Written by
Vikas Ingle

🚨 द टाईम्स ऑफ महाराष्ट्र 💢

  • व्हायरल व्हिडिओत अंधश्रद्धेचा प्रचार?; सोशल मीडियावर तीव्र चर्चा

सध्या सोशल मीडियावर एका तथाकथित महाराजांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अनेक महिलांच्या डोक्यावर पाणी टाकणे, ओवाळणे तसेच काही धार्मिक विधी करून त्यांच्या अंगातील बाधा, जादूटोणा किंवा कथित संकटे दूर केली जात असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी हा प्रकार अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारा असल्याची टीका केली आहे.

 

राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अशा प्रकारचे व्हिडिओ खुलेआम प्रसारित होत असल्याने संबंधित यंत्रणा, गृह विभाग आणि प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, या व्हिडिओतील दावे किंवा कथित उपचारांना दुजोरा देणारा कोणताही अधिकृत किंवा वैज्ञानिक पुरावा समोर आलेला नाही.

 

निर्भीड न्यूज या व्हायरल व्हिडिओतील कोणत्याही दाव्याची पुष्टी करत नाही. तसेच या प्रकरणात कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. वाचकांनी सोशल मीडियावरील कोणतीही माहिती आंधळेपणाने स्वीकारू नये आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या दाव्यांबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

 

━━━━━━━━━━━━━━━━━━

✍️ विकास इंगळे

मुख्य संपादक –  गाथा विकास इंगळे

📞 Mo. 9702505678

━━━━━━━━━━━━━━━━━━

 

# द टाईम्स ऑफ महाराष्ट्र #अंधश्रद्धा #व्हायरलव्हिडिओ #फॅक्टचेक #महाराष्ट्र

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल