[gtranslate]

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पाठिंबा!

Author Image
Written by
Divya Chavan

📍 पुणे
आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा पाठिंबा!
महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी व आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन, पुणे शहर यांनी जाहीर
पाठिंबा दिला आहे.
दि. ५ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तसेच आदिवासी विद्यार्थी व समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेला हा संघर्ष सामाजिक न्याय, संविधानिक अधिकार आणि आदिवासी समाजाच्या भवितव्याशी निगडित आहे.


आंदोलकांच्या प्रमुख मागण्या :
🔹 गडचिरोली आश्रमशाळेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ₹१ कोटी मदत व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
🔹 आदिवासी वसतिगृह व आश्रमशाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचा ₹१० कोटींचा विमा काढावा.
🔹 प्रलंबित १२,५०० व इतर आदिवासी नोकरभरती तातडीने राबवावी तसेच कार्यमुक्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती करावी.
🔹 PESA कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी.
🔹 रक्ताच्या नातेसंबंधावर आधारित जात पडताळणी प्रमाणपत्र व बंजारा अभ्यास समितीसंदर्भातील शासन निर्णय रद्द करावा.
🔹 शासन निर्णयातील वयाची अट रद्द करावी.
शासनाने आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी तातडीने संवाद साधून सर्व मागण्यांवर ठोस, लेखी आणि कालबद्ध निर्णय घ्यावा. अन्यथा हा संविधानिक व लोकशाही मार्गाने सुरू असलेला संघर्ष अधिक व्यापक करण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिला आहे.

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल