[gtranslate]

दिव्यात गणेशोत्सवाच्या नावाखाली अनधिकृत कमानी-होर्डिंगचा सुळसुळाट?

Author Image
Written by
Divya Chavan

दिव्यात गणेशोत्सवाच्या नावाखाली अनधिकृत कमानी-होर्डिंगचा सुळसुळाट?

जीवितहानीच्या घटना ताज्या असतानाही प्रशासनाचे दुर्लक्ष; तात्काळ कारवाईची मागणी

दिवा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिवा विभागात ठाणे महानगरपालिकेची परवानगी न घेता लोखंडी कमानी, होर्डिंग आणि बॅनर उभारले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संरचनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्यासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

यापूर्वी अनधिकृत होर्डिंग व कमानी कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे दिव्यातील अशा संरचनांवर वेळीच कारवाई करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त तसेच मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना लेखी निवेदन दिले आहे.

परवानगीशिवाय उभारलेल्या कमानी व होर्डिंगवर संबंधित कायद्यांनुसार कारवाई करावी, तसेच सार्वजनिक रस्त्यावर धोका किंवा अडथळा निर्माण करणाऱ्या आयोजक व जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

“गणेशोत्सवाला विरोध नाही; मात्र उत्सवाच्या नावाखाली नागरिकांच्या जीविताशी खेळ होऊ नये. दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा ती होण्यापूर्वीच प्रशासनाने जागे होणे गरजेचे आहे,” अशी भूमिका ॲड. रोहिदास मुंडे यांनी मांडली.

दिव्यातील अनधिकृत कमानी व होर्डिंगची तात्काळ पाहणी करून धोकादायक संरचना हटवाव्यात आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

#दिवा #गणेशोत्सव #अनधिकृतहोर्डिंग #ठाणेमहानगरपालिका # दटाईमऑफमहाराष्ट्र न्यूज

 

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल