[gtranslate]

तुर्भे येथील कंपनीत खाद्यपदार्थांवरील एक्सपायरी डेट ची अदला बदल

Author Image
Written by
Divya Chavan

तुर्भे येथील एका कंपनीत खाद्यपदार्थांवरील एक्स्पायरी डेट बदलून वाढीव तारीख असलेले स्टिकर चिकटवण्याचा काळाबाजार केला जात असल्याचा प्रकार गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला. पथकाने या कंपनीवर छापा घालून परदेशात पाठवला जाणारा सुमारे ७५ लाखांचा साठा जप्त केला. एफडीएच्या मदतीने याप्रकरणी संबंधितांवर तुर्भे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तुर्भे एमआयडीसीमधील एका कंपनीत भारतीय उत्पादनांवरील मूळ ‘एक्स्पायरी डेट’ वाढवलेले स्टिकर चिकवले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे यांच्या पथकाने २४ ऑगस्टला त्या ठिकाणी छापा टाकला. मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थाचा साठा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाला (एफडीए) कळवण्यात आले. त्यानुसार एफडीएने सलग ५ दिवस पंचनामा करून बारा जणांवर कारवाई केली. Çbb

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

और पढ़ें

E-Paper

लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल