दिवा उड्डाणपूल बाधितांना न्याय कधी? विजय भोईर आक्रमक

Author Image
Written by
Vikas Ingle

| दिवा

दिवा उड्डाणपूल बाधितांना न्याय कधी? विजय भोईर आक्रमक

दिवा | प्रतिनिधी : दिवा रेल्वे उड्डाणपूल प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा योग्य मोबदला अद्यापही मिळालेला नसल्याचा दावा पांडुरंग भोईर यांनी केल्यानंतर या प्रकरणावर विजय भोईर यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनावर तीव्र टीका केली आहे.

विजय भोईर यांनी म्हटले की, विकास प्रकल्पांच्या नावाखाली नागरिकांच्या जमिनी संपादित केल्या जातात; मात्र त्यांना वेळेत आणि न्याय्य मोबदला मिळत नसेल, तर तो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा विषय आहे. बाधित नागरिकांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

पांडुरंग भोईर यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित प्रशासनाने जबरदस्तीची भूमिका घेतल्याचा त्यांचा आरोप असून, आपल्या हक्कासाठी न्यायालयात ठामपणे बाजू मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

याप्रसंगी विजय भोईर यांनी दिवा रेल्वे उड्डाणपूलाचा प्रश्न मार्गी लागल्याचा केवळ आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप करत, प्रत्यक्षात अनेक बाधितांचे मोबदला व पुनर्वसनाचे प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगितले. संबंधित प्रशासनाने तातडीने सर्व बाधितांना न्याय देऊन मोबदला आणि पुनर्वसनाबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली.
Watch on Instagram

भारत-पाकिस्तान के बीच संघर्ष विराम के बाद कांग्रेस ने संसद का विशेष सत्र बुलाने की मांग की है। क्या सरकार को इस पर विचार करना चाहिए?

और पढ़ें

E-Paper

लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लोड हो रहा है...
लाइव टीवी वीडियो ई-पेपर चैनल